जम्मू -काश्मीर पोलिसांच्या मते, हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला आणि संपूर्ण परिसरात धूर पसरला. घटनास्थळी पोलिसांचे पथक पाठवण्यात आले आहे.तसेच रुग्णवाहिका आणि अग्निशमनदलाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.
अपघातग्रस्त हेलिकॉप्टर लष्कराचे असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचे कारण परिसरात मुसळधार पाऊस आणि धुके असल्याचे सांगितले जात आहे. बचाव पथकांनी घटनास्थळी पोहोचून दोन जखमी लष्करी जवानांना बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं. मात्र, दोघंही गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.