लडाखमध्ये भारतीय जवानांसोबत मोठी दुर्घटना घडली आहे. श्योक नदीत रणगाडा अडकल्याने 5 जवान शहीद झाले. लडाखच्या दौलत बेग ओल्डी भागात शुक्रवारी रात्री भारतीय लष्कराच्या T-72 रणगाड्याचा लष्करी सराव सुरू होता. त्याचवेळी दोन रणगाडे एकाच वेळी श्योक नदी ओलांडत होते. नदी ओलांडताना पाण्याची पातळी खूप वाढली. कसेबसे एक टॅंक सुटले पण दुसरे टॅंक श्योक नदीत अडकले .
या अपघातावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. आपल्या शूर सैनिकांनी देशासाठी केलेली अनुकरणीय सेवा आपण कधीही विसरणार नाही, असे ते म्हणाले. शोकाकुल कुटुंबियांबद्दल त्यांच्या मनःपूर्वक संवेदना. या दुःखाच्या प्रसंगी संपूर्ण देश शहीद जवानाच्या कुटुंबासोबत उभा आहे.