प्रभारी बिसरख कोतवाली यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचे नाव सैंगी असे आहे. मुलीच्या कुटुंबीयांना घरातून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. मात्र, खोडा येथे राहणाऱ्या मुलीच्या मित्राचा पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचे तपासात उघडकीस आले. तेव्हापासून ती तणावाखाली होती. कुटुंबीयांनीही पाच दिवसापासून ती तणावाखाली असल्याची माहिती दिली आहे. यामुळे मुलीने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठविले आहे.पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.