दिल्ली मेट्रोमध्ये मुलीची स्टंटबाजी पाहून सर्व थक्क, व्हिडीओ व्हायरल!

रविवार, 20 ऑगस्ट 2023 (16:27 IST)
social media
दिल्ली मेट्रोच्या आत किंवा बाहेर असभ्य कृत्ये आणि स्टंट्स प्रवाशांना त्रास देत आहेत. दिल्ली मेट्रोमुळे दररोज व्हायरल व्हिडिओ  बनत आहेत. एकदा मेट्रोच्या आत एका मुलीच्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
सोशल मीडिया यूजर्स आता हा व्हिडीओ पाहून विविध कमेंट करत आहेत. दोन दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रो रेग्युलेटरी ऑथॉरिटीने (डीएमआरसी) हे कृत्य करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला होता, मात्र त्याचा स्टंटबाजांवर काहीही परिणाम झाला नाही.
 
पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोमध्ये एका मुलीचा स्टंट करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्पोर्टी पोशाखातील एक मुलगी सार्वजनिक ठिकाणी स्टंट करताना दिसत आहे. मुलीचा स्टंट पाहून लोकांना आश्चर्य वाटले.असभ्य वर्तन असून देखील  लोकांच्या नजरात तिच्यावर खिळल्या होत्या.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by MISHA SHARMA

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती