चांद्रयान 3 मिशनचे लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर चंद्राला प्रदक्षिणा घालत आहे. ISRO ने ट्विट केले की चांद्रयान-3 चे दुसरे आणि अंतिम डिबूस्टिंग मॅन्युव्हर यशस्वीरित्या केले गेले आहे आणि आता 23 ऑगस्टची वाट पाहत आहे, जेव्हा भारत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगसह इतिहास रचेल आणि असे करणारा जगातील चौथा देश बनेल.
लॅंडर विक्रमने चंद्रापासून कमीत कमी 25 किलोमीटर आणि जास्तीत जास्त 134 किलोमीटर अंतरावर आपली कक्षा स्थापन केली आहे. चंद्रयान 3 चे दुसरे आणि शेवटचे डी-बूस्टिंग ऑपरेशन यशस्वी झाले आहे. लँडर मॉड्युल उतरण्यापूर्वी त्याची अंतर्गत तपासणी केली जाईल. यानंतर 23 ऑगस्टला चंद्रावर सूर्य उगवताच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रक्रिया सुरू होईल. चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो. यामुळेच चांद्रयान 3 मोहीम 14 दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर संशोधन करणार आहे. 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग झाल्यानंतर, लँडर विक्रम आपले काम सुरू करेल.
चंद्रयान 3 14 जुलै रोजी प्रक्षेपित झाले. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी त्याने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. 6, 9, 14 आणि 16 ऑगस्ट रोजी चंद्रयान 3 चंद्राच्या आणखी जवळ गेले. 19 ऑगस्ट रोजी लॅंडर आणि प्रोपल्शन मॉड्युल एकमेकांपासून वेगळे झाले. तिथून लॅंडरचा चंद्राच्या दिशेने एकट्याचा प्रवास सुरु झाला आहे. लॅंडर चंद्रापासून अवघ्या 25 किलोमीटरवर पोहोचले असून 23 ऑगस्ट रोजी ते चंद्रावर यशस्वीपणे चांद्रयान 3( Chandrayaan 3) लॅंडिंग करेल.