Cyclone Remal : तुफानी रेमल चक्रीवादळ आज धडकणार, अनेक भागांना अलर्ट जारी
रविवार, 26 मे 2024 (14:30 IST)
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ रेमल आज रात्री पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांगलादेशातील खेपाडा दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितले की, चक्रीवादळ ताशी 110-120 किलोमीटर वेगाने किनारपट्टीवर धडकू शकते. या काळात समुद्रात 1.5 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे,
भारतीय हवामान खात्याचे म्हणणे आहे की उत्तर बीओबीवरील एससीएस रेमल खेपुपारा पासून सुमारे 260 किमी एसएसडब्ल्यू आणि सागर बेटांचे 240 किमी एसएसई आहे. चक्रीवादळ मध्यभागी 90-100 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह उत्तरेकडे सरकत आहे.
काही भागांत वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी 26 मे रोजी वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 120 किमी.प्रतितास असू शकतो. असं हवामान खात्यानं सांगितलं आहे.
हवामान खात्यानं वादळाची तीव्रता तीव्र होऊन रविवार सकाळ पर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतरण होईल. तसेच रविवारच्या मध्यरात्री सागर बेट आणि खेपुपारा दरम्यान पश्चिम बंगाल आणि लगतच्या बांगलादेशच्या किनारपट्टीला चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 26 आणि 27 मे रोजी पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशाच्या किनारी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
परगणा पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केले आहे. तर कोलकाता, नादिया, हावडा, पूरबा मेदिनीपूर जिल्ह्यात आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी केलं आहे.
एनडीआरएफचे निरीक्षक झहीर अब्बास म्हणाले, 'आम्ही चक्रीवादळासाठी पूर्णपणे तयार आहोत. येथे चक्रीवादळ आले तर आपले सैनिक प्रत्येक प्रकारच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज असतात. आमची टीम सुसज्ज आहे. आमची टीम झाड पडणे किंवा पूर बचाव इत्यादीसाठी सज्ज आहे. आम्ही प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत.
या रेमल चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम नाही होणार. पुढील 24 तासांत राज्यातील तापमानात वाढ होईल. काही भागांत अवकाळी पाऊस हजेरी लावेल. असे भारतीय हवामान खात्यानं सांगितलं आहे.