बिहार: पाटण्यात जिम ट्रेनरवर जीवघेणा हल्ला, डॉक्टर आणि पत्नीविरोधात एफआयआर दाखल

रविवार, 19 सप्टेंबर 2021 (16:07 IST)
बिहारची राजधानी पाटणामध्ये एक हृदयद्रावक प्रकरण समोर आले आहे. शहरातील जिम ट्रेनरच्या हत्येचा कट रचल्याबद्दल प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉ राजीव कुमार सिंह आणि त्यांची पत्नी खुशबू सिंह यांच्याविरोधात कदमकुआन पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आली आहे. यामध्ये अज्ञात गुन्हेगारांचाही समावेश करण्यात आला आहे. ठाणे  प्रभारींनी गेल्या शनिवारी रात्री उशिरा या घटनेची पुष्टी केली. पोलिसांनी संध्याकाळी उशिरा विचारपूस केल्यानंतर या जोडप्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचवेळी, डॉक्टर राजीव यांना हत्येच्या कटात नाव समोर आल्यानंतर जेडीयू वैद्यकीय अधिकारी आणि संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आले.
 
 एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार, हे प्रकरण राजधानी पाटणा जिल्ह्यातील कदमकुआ  पोलीस ठाण्या परिसरातील आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जखमी जिम ट्रेनर विक्रमच्या वक्तव्यावर एफआयआर नोंदवण्यात आली आहे.या जिम ट्रेनरने डॉ.आणि त्यांच्या पत्नी विरोधात तक्रार केली आहे.या जोडप्यावर जिम ट्रेनर विक्रम सिंह यांच्यावर गोळ्या झाडल्याचा गंभीर आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमकुआ मधील बुद्धमूर्तीजवळ जखमी जिम ट्रेनरने शनिवारी सकाळी पोलिसांना दिलेल्या निवेदनात फिजिओथेरपिस्ट डॉ राजीव कुमार सिंह आणि त्यांची पत्नी खुशबू सिंह यांची नावे दिली होती. विक्रमने सांगितले की, डॉक्टरांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मी घराबाहेर पडलो तेव्हा वाटेत उभ्या असलेल्या दोन गुन्हेगारांनी दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू केला. या प्रकरणात सुपारी किलरचा वापर केला गेला आहे.
 
पोलिसांनी प्रकरणाचा तपास केल्यावर त्यांना आढळले की डॉ.ची पत्नी आणि जिम ट्रेनर यांचे अनैतिक संबंध होते.त्यामुळे डॉ.ने जिम ट्रेनरला धमकवण्यास सुरु केले.या मुळे जिम ट्रेनर खुशबू पासून दुरी बनवायला सुरु केले.
 
या प्रकरणात पोलिसांनी तपास करताना जखमी जिम ट्रेनरचा मोबाईल जप्त केला आहे. यानंतर पोलिसांनी त्याचा कॉल सीडीआर काढला आहे. एसएसपीच्या मते, खुशबू आणि विक्रम यांच्यात या वर्षाच्या जानेवारीपासून आत्तापर्यंत 1100 वेळा बोलणी झाली आहेत. . 
 
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिम ट्रेनरला गोळ्या घालण्याचे हे प्रकरण राजधानीचे हाय प्रोफाइल प्रकरण बनले आहे.लोकांनी या घटनेबद्दल पोलिसांना फोन केला होता. यानंतर कदमकुआ पोलीस ठाण्याचे पोलीस पोहोचले. गुन्हेगारांनी ज्या ठिकाणी गोळीबार केला त्या ठिकाणी तो वाहनाशिवाय होता. कारण, घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा शोध घेण्यात आला आहे. ज्यावरून असे दिसून आले की, दोन्ही गुन्हेगार पायीच पळून गेले. पोलीस अधिकाऱ्याच्या मते, गुन्हेगारांनी त्यांची कार गुन्हेगारीच्या ठिकाणापासून दूर कुठेतरी उभी केली असावी, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती