काय सांगता ,शासकीय रुग्णालयात मांत्रिकाकडून उपचार

रविवार, 19 सप्टेंबर 2021 (15:04 IST)
सुपौल येथील एका शासकीय रुग्णालयात एका तरुणाला सापाने चावा घेतल्यावर दाखल केले होते. त्याला उपचारासाठी सलाईन देण्यात आली होती.दरम्यान त्याच्या वर एक मांत्रिक देखील अघोरी उपचार करीत होता.आजच्या आधुनिक काळात अशी घटना घडणं हे आश्चर्यकारकच आहे.सध्या या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
ही घटना आहे सुपौल जिल्ह्यातील भवनपुराची एका युवकाला सापाने दंश केल्यावर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.डॉ.त्याच्यावर उपचार करत होते. सलाईन लावलेला हा तरुण रुग्णालयाच्या बाहेर बसलेला होता.त्याच्या कुटुंबीयांनी चक्क एका मांत्रिकाला बोलावले होते.तो तरुण त्या मांत्रिका समोर बसलेला होता आणि मांत्रिक त्याच्या वर काही अघोरी तंत्र-मंत्र करीत होता.मांत्रिकाच्या उपचाराने देखील जेव्हा त्या तरुणाला काहीच आराम पडला नाही.तेव्हा कुटुंबीयांनी पुन्हा डॉ.कडे धाव घेऊन त्याचा वर उपचार करण्याची विनवणी केली.खेर डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवले.
 
खरं तर सध्याचे युग विज्ञानाचे आहे आपण 21 व्या शतकात जात आहोत.विज्ञानाने जगात खूप प्रगती केली आहे. तरी ही आजही काही लोक अंधविश्वासाला बळी पडत आहे.आपला जीव गमावत आहे. या प्रकरणी मांत्रिकांवर फसवेगिरीचा गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती