महिलांसाठी ‘या’ राज्यात दारूची वेगळी दुकानं

शनिवार, 29 फेब्रुवारी 2020 (11:00 IST)
मध्य प्रदेश सरकारने महिलांसाठी दारूची (Alcohol shop)वेगळी दुकानं सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही अडचणींशिवाय महिलांना दारू खरेदी करता यावी हा कमलनाथ सरकाराचा प्रयत्न आहे. सुरुवातीला भोपाळ, इंदूर, जबलपूर आणि ग्वाल्हेरमध्ये एक-एक दुकान सुरु करण्यात येणार आहेत. या दुकानांमध्ये महिलांना आवडणारे वाईन्स आणि व्हिस्कीचे सर्व ब्रँड्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
 
ही दुकानं मॉल्स किंवा इतर ठिकाणी सुरु करण्यात येणार आहे. अशा ठिकाणी महिलांना दारू (Alcohol shop) खरेदी करणं अधिक सोयीचं होणार आहे. महिलांसाठी दारूची दुकानं सुरु केल्यामुळे राज्याच्या महसूली उत्पन्नात वाढ होणार आहे. तसेच स्थानिक ब्रँड्सना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार राज्यातील भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर आणि जबलपूरमध्ये वाईन फेस्टीव्हलचे आयोजन करतात. स्थानिक व्यापाऱ्यांनी ही मागणी अनेक दिवसांपासून लावून धरली होती, अशी माहिती व्यावसायिक कर विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आय.सी.पी.केशरी यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती