सरकारचा रिमोट माझ्या हाती नाही: शरद पवार

शनिवार, 22 फेब्रुवारी 2020 (15:03 IST)
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यात असलेल्या ठाकरे सरकारचा रिमोट माझ्या हाती नाही असं स्पष्ट केले आहे. एका खाजगी कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले विचार मांडले.
 
महाविकास आघाडीचं सरकार हे पाच वर्षे चालणार याची पवारांना खात्री आहे. त्यात कुठलीही अडचण येणार नाही असंही पवार यांनी म्हटले. 
 
उद्धव ठाकरेंचा मार्ग योग्य असून मी विचारल्याशिवाय सल्ला देत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. या दरम्यान पवार यांनी स्पष्ट केले की “ठाकरे सरकारचा रिमोट माझ्या हाती नाही. सगळं काही सुरळीत चालू लागल्यावर मी लांब झालो. आवश्यता भासली तरच सल्ला द्यायचा अन्यथा लांब रहायचे असे मी ठरवले आहे”.
 
बाळासाहेब ठाकरे हे माझे खूप चांगले मित्र होते आणि दिलेला शब्द पाळणारे होते, असंही शरद पवार यांनी म्हटलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती