बसची रस्त्यालगतच्या झाडाला जोरदार धडक, 15 जण गंभीर जखमी
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2024 (13:17 IST)
पश्चिम बंगाल मध्ये आज सकाळी बसचा भीषण अपघात झाला असून यामधील प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात नदिया जिल्ह्यातील तेहट्टा मध्ये झाला आहे.
ही बस करीमपुर वरून कृषनगर कडे जात होती अशी माहिती समोर आली आहे. अचानक बस रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. ही धडक एवढी भीषण होती की यामधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सर्व जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच हा अपघात कसा झाला याची चौकशी सुरु आहे.