या हल्ल्यावरून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, माझ्यावर हल्ला करणे हे सुनियोजित कट आहे. या मध्ये पोलिसांचा देखील सहभाग असण्याची शक्यता आहे. तर काहींनी हल्लेखोरांचा सामना केला.
हल्ल्यांनंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली त्यात त्यांनी लिहिले, आज सकाळी घरात सर्वजण नवरात्रीच्या पूजेत व्यस्त असताना स्थनिक पोलिसांच्या संरक्षण आणि देखरेखी खाली अनेक गुंड्यानी माझ्या कार्यलयासह मजदूर भवनावर हल्ला केला आणि पोलिसांनी बघ्याची भूमिका केली. ते मूक होते. हल्लेखोर पोलिसांसमोर शस्त्र उगारत होते 15 बॉम्ब फेकले आणि डझन हुन अधिक राउंड फायर केले. बंगाल पोलीस हे राज्य सरकारचे बाहुले बनले आहे. हे सर्व लज्जास्पद आहे.