मनोरंजन जगतातून एक दुःखद बातमी आली आहे. 26 वर्षीय मॉडेल आणि मिस पुडुचेरी सॅन राहेल गांधी यांचे निधन झाले. तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. सॅनने गेल्या रविवारी जीआयपीएमईआर रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला.
पोलिसांना संशय आहे की सॅन राहेल कर्जात आणि तणावात होती. त्यामुळे तिने इतके मोठे पाऊल उचलले. तिचे नुकतेच लग्न झाले होते. 5 जुलै रोजी सॅनने झोपेच्या गोळ्यांचे अति सेवन केले .त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सॅन राहेलकडून एक सुसाईड नोट देखील जप्त करण्यात आली आहे. या नोटमध्ये लिहिले आहे की तिच्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही. त्याच वेळी, तपासकर्त्यांनी उघड केले की सॅन राहेलला तिच्या कामासाठी पैशांची आवश्यकता होती, ज्यामुळे तिला तिचे दागिने गहाण ठेवावे लागले.
सॅन राहेल उर्फ शंकर प्रिया पुडुचेरीतील करमणी कुप्पम येथे राहत होती. ती किडनीच्या आजाराने देखील ग्रस्त होती आणि तिच्यावर उपचार सुरू होते. पुडुचेरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
तिच्या काळ्या त्वचेची पर्वा न करता, सॅन राहेलने मॉडेलिंगच्या जगात आपला ठसा उमटवला. सॅन राहेलने 2020-2021 मध्ये मिस पॉंडिचेरीचा किताब जिंकला. यापूर्वी तिने 2019 मध्ये मिस डार्क क्वीन तमिळनाडूचा किताब जिंकला होता. तिने मिस बेस्ट अॅटिट्यूडचा किताब देखील जिंकला आहे. राहेलने ब्लॅक ब्युटी कॅटेगरीत मिस वर्ल्डचा किताबही जिंकला होता.