बाप्परे, ८ वर्षाच्या मुलीच्या डोक्यातून १०० जंत

सोमवार, 23 जुलै 2018 (15:13 IST)
दिल्लीमध्ये आठ वर्षांच्या विदिशा नावाच्या मुलीच्या डोक्यातून डॉक्टरांनी १०० जंत बाहेर काढले आहेत. आता या मुलीची प्रकृती स्थिर आहे. विदिशाला गेल्या सहा महिन्यांपासून तीव्र डोकेदुखीचा त्रास होत होता. तिचं वजन २० किलोने वाढलं होतं. त्यामुळे तिला औषधांचे मोठे डोस देऊनही विशेष फरक पडत नव्हता. त्यात तिला श्वसनाचा त्रासही सुरू झाल्यामुळे तिची सिटी स्कॅन चाचणी करण्यात आली. त्या चाचणीचा अहवाल पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. तिच्या मेंदुला सूज आली होती आणि त्याचं कारण तिच्या डोक्यात असणारे तब्बल १०० हून अधिक टेपवर्म (जंत) हे होतं.
 
त्यानंतर लगेचच तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि तिच्या डोक्यातून १०० हून अधिक जंत बाहेर काढले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, विदिशाने टेपवर्म संक्रमित अन्नाचं सेवन केलं होतं. जंत तिच्या रक्तातून मज्जासंस्थेत शिरला आणि तिथून तो मेंदुपर्यंत पोहोचला. तिथेच त्याने अंडी घातल्याने विदिशाला त्रास होत होता. जेव्हा जंतांचं प्रमाण अधिक झालं तेव्हा मेंदूला सूज आली आणि त्याच्या क्रियेवर ताण पडू लागला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती