सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिस्त्र आणि पी. सी. पंत यांच्या पिठाने माफी मागून हे प्रकरण मिटविण्याची सूचना केली होती. मात्र, वकील कपिल सिब्बल यांनी राहुल यांनी माफी मागण्यास नकार दिल्याचे स्पष्ट केले. आता या प्रकरणी 17 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. राहुल यांना 6 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. गतवर्षी ठाण्यातील सभेत राहुल गांधी यांनी संघावर हा आरोप केला होता.