‘बेपत्ता’ परमबीर सिंह यांचा ठावठिकाणा लागेना

गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (21:57 IST)
मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्र्यावर आरोप केलेल्या शंभर कोटी रुपये लेटरबाॅम्बमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर सर्व घडामोडीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाने परमबीर सिंहांना अनेक वेळा समन्स बजावलं. मात्र, सिंह हे हजर झाले नाहीत. दरम्यान, परमबीर यांचा ठावठिकाणा सापडत नसल्याची कबुली राज्य सरकारने मुंबई हाय कार्टात दिली आहे.
 
परमबीर सिंह यांचा पत्ता लागत नसल्यामुळे यापुढे ॲट्रॉसिटी प्रकरणात त्यांना दिलासा देणार नाही, असं देखील राज्य सरकारने म्हटलं आहे. त्याचबरोबर परमबीर यांच्याविरोधात ठाणे पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी आणि भ्रष्टाचारप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात अटकेपासून आणि कठोर कारवाईपासून संरक्षण मिळावे.अशी मागणी करणारी याचिका परमबीर सिंह यांनी 4 महिन्यांपूर्वी कोर्टात दाखल केली आहे.राज्य सरकारने आतापर्यंत प्रत्येक सुनावणीमध्ये सिंह यांच्यावर कठोर कारवाई करणार नाही, अशी भूमिका मांडली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती