महाराष्ट्रात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची सुरक्षा वाढवली, भुजबळ म्हणाले- मुंबई पोलिसांसाठी आव्हान

सोमवार, 14 ऑक्टोबर 2024 (08:14 IST)
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस, अजित पवार यांच्या सरकारी निवास्थानावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) चे नेता नेता बाबा सिद्दीकी यांच्या अचानक झालेल्या हत्येमुळे पूर्ण शहराला धक्का बसला आहे. यादरम्यान दक्षिण मुंबईच्या मालाबार हिल परिसरामध्ये स्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारी निवस्थानावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी मालाबार हिल परिसरामध्ये काही महत्वपूर्ण भागामध्ये सुरक्षासाठी बॅरिकेड्स लावण्याचे आदेश दिले आहे. शनिवारी बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली आहे पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे अशी माहिती समोर आली आहे.  
 
मुंबई पोलिसांसाठी आव्हान : भुजबळ
तसेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर जबाबदारी केवळ गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही आहे, असे राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले. तसेच आठवडाभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भायखळा प्रमुखाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांची शनिवारी हत्या झाली. मुंबई पोलिसांसाठी हे आता हे मोठे आव्हान आहे. तसेच ते म्हणाले की, हे काँट्रॅक किलिंग असून पोलिसांना मोकळेपणाने लगाम द्यायला हवा. त्याची जबाबदारी केवळ गृहमंत्र्यांची नसून मुख्यमंत्र्यांचीही आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती