मुंबईच्या शिवडी रेल्वे स्थानकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या मध्ये एक तरुण लोकल ट्रेनला लोम्बकळून स्टंट करतांना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता तो तरुण रेल्वे पोलिसांना सापडला असून त्याने आपला एक हात आणि एक पाय गमावला आहे.