मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये ३६ वर्षीय रुग्णाचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईतील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या १५०वर पोहोचली आहे. सध्या मुंबईत महापालिकेच्या केईएम रुग्णालय, सायन रुग्णालय, नायर रुग्णालय आणि कुपर रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शन आणि औषधांसाठी महापालिकेने विशेष व्यवस्था स्थापन केली आहे, जेणेकरून महापालिकेच्या रुग्णालयात याचा तुटवडा भासून नये.