मुंबइतुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे INS रणवीरच्या युद्धनौकेत मोठा स्फोट झाला आहे. झालेल्या स्फोटात 3 भारतीय नौदलाच्या जवानांना आपला जीव गमवावा लागला.स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. स्फोटात INS रणवीर युद्धनौकेचं कोणतंही नुकसान झालं नसल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे.
तसेच स्थानिक नौदल रुग्णालयात जखमी झालेल्या 11 जणांवर उपचार सुरू आहेत,स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मृत सैनिकांची ओळख अद्याप पटलेली नाही.