खळबळजनक ! 20 वर्षीय तरुणीची बलात्कार करून हत्या

शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (11:43 IST)
कुर्ल्याच्या HDIL परिसरात एका 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह एका बंद इमारतीच्या टेरेसवर आढळला. पोलिसांनी  मृतदेह ताब्यात घेऊन  तातडीने राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला. अहवाल नंतर तरुणीवर अतिप्रसंग झाल्याचे समजले. पोलिसांनी बलात्कार करून हत्या केल्याचा गुन्हा नोंदवून घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप तरुणीची ओळख पटलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार काही तरुण HDIL कंपाउंडच्या बंद पडलेल्या इमारतीच्या टेरेसवर सोशल मीडियावर टाकण्यासाठी व्हिडीओ शूट करण्यासाठी  गेले असता  त्यांना  तरुणीचा मृदेह आढळला .त्यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी तपास सुरु केले आहे.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती