संजय राऊत यांची अलिबाग येथील संपत्तीही ईडीने जप्त केली आहे.अलिबाग येथील 8 भूखंड आणि दादर येथील फ्लॅट ईडीने जप्त केल्याची माहिती मिळते आहे, तसंच 1हजार 34 कोटींच्या पत्राचाळ जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणीही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, "अशा कारवायांपुढे शिवसेना झुकणार नाही. मी कष्टाने कमवलेली संपत्ती आहे. माझा गुन्हा सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडेन." ईडीने नोटीस न देता ही मालमत्ता जप्त केल्याचंही संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
"दादरसाख्या भागात माझं फार फार तर टू रुम किचनचं घर आहे. एखाद्या मराठी माणसाचं असतं तसं. अलिबागला माझं गाव आहे. तिकडे साधारण 50 गुंठ्याची जमीन आहे. याला कोणी संपत्ती म्हणत असेल तर तेवढी संपत्ती आहे." माझी संपत्ती कष्टाच्या पैशांची आहे. हा राजकीय दबाव आहे,"असं संजय राऊत म्हणाले.