पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी फिरोज याने आपली पत्नी रुकसानाकडे दारू घेण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र तिने पैसे देण्यास नकार दिला त्यामुळे फिरोजने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यावेळी रुकसाना हिने तत्काळ आग विझवत घटनास्थळावरून पळ काढला. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.