ठाण्यातील रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी ही माहिती दिली. डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराची घटना निंदनीय असल्याचा त्यांनी पुनरुच्चर केला. ते म्हणाले, आतापर्यंत या घटनेतील ३३ आरोपींची नावे समोर आली असून त्यातील २७ जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.यातील आरोपी कितीही मोठा असला किंवा तो कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्यांचा नातेवाईक असला तरी त्याची गय केली जाणार नाही.संबंधितांवर कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना दिले आहेत.अशा घटना पुन्हा होणार नाही, अशी कायद्याची जरब राहील,अशी कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत.