परिवहन मंत्री अनिल परबांच्या घराबाहेर 1800 प्रशिक्षणार्थ्यांचे आंदोलन

सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (12:39 IST)
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्रे येथील घराबाहेर 800 प्रशिक्षणार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 2019 साली काही उमेदवारांची प्रक्रिया पूर्ण झाली होती मात्र त्यांना महामंडळानं अद्यापही नियुक्ती दिली नसल्यामुळे 1800 आंदोलकांकडून त्वरीत कामावर घेण्याची मागणी केली जात आहे.
 
एसटी महामंडळाकडून 2019 ला प्रक्रिया पूर्ण करुन प्रशिक्षणार्थ्यांना भरती करण्यात आलं होतं. मात्र नियुक्ती देण्यात आली नव्हती. 1800 प्रशिक्षणार्थी आंदोलकांकडून कामावर घेण्याची मागणी केली जात आहे. या आंदोलकांमध्ये चालक, वाहक, सहाय्यक, टेक्निशियन्सचा समावेश करण्यात आला आहे. ठिकठिकाणी प्रशिक्षणार्थी आंदोलकांकडून मोर्चाची तयारी करण्यात आली आहे. तर परिस्थिती हातळण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती