पंतप्रधान मोदींनी माफी मागितली पण त्यांच्या चेहऱ्यावर राग आणि अहंकार दिसत होता.
सरकारला पुतळा बनवण्याची घाई होती. कारण निवडणूका जवळच होत्या. राम मंदिराची गळती, संसद भवनातील गळती, पूल उद्घटनापूर्वी कोसळते हे आमच्या कडून गेल्या 70 वर्षांचा हिशोब मागतात तर ह्यांनी केलेल्या गोष्टी 70 दिवस काय 70 आठवडे देखील चालत नाही.
तर या वर प्रतिक्रिया देत नाना पाटोळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असा केला जाईल महाराष्ट्राच्या जनतेने हा विचारही केला नाही. आंदोलनासाठी परवानगीच्या विषयावर ते म्हणाले, आमच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे की नाही हे मला माहित नाही. ते तानशाही करत आहे. त्यांना वाटते की आमचा विरोध कोणीही करू नये. राज्य कर्जबाजारी झाले आहे. महाराष्ट्रात लूट सुरु आहे त्याला आपल्याला रोखायचे आहे.असे ते म्हणाले.