या संदर्भात परिवहन विभागाने 30 ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केली आहे. या मध्ये व्हीआयपी क्रमांकाची मागणी सर्वाधिक पुणे, रायगड, रौगड, नाशिक,कोल्हापूर आणि औरंगाबाद या शहरांमध्ये असल्याचे नमूद केले आहे.चारचाकी वाहनांसाठी आवडता क्रमांक 0001 चे शुल्क सध्या 3 लाख रुपयांवरून 5 लाख करण्यात आले आहे.
राज्यात 0001 अतिरिक्त 0009, 0099, 0999, 9999 आणि 0786 या क्रमांकासाठी परिवहन विभागाने वेगवेगळे शुल्क निर्धारित केले आहे. चारचाकी आणि त्यावरील वाहनांचे शुल्क दीड लाखांवरून अडीच लाख केले आहे. तर दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी 20 हजार रुपयांऐवजी 50 हजार केले आहे.