तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

शनिवार, 31 ऑगस्ट 2024 (12:19 IST)
नुकतेच राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी एक वक्तव्य केले त्यात ते म्हणाले, मी कट्टर शिवसैनिक आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांशी कधीच जुळवाजुळव झाली नाही.मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या नेत्यांजवळ जरी बसलो तर बाहेर येऊन मळमळत. 
 
सावंतांच्या या वक्तव्यावर चांगलाच गदारोळ झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तानाजी सावंत यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 
तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, कोणी काहीही बोलले तरी मी यावर भाष्य करणार नाही. माझ्या जनसन्मान यात्रेत मी काहीच बोलणार नाही. कोणावर काहीच भाष्य करणार नसल्याचे मी सुरुवातीस ठरवले होते. माझ्यावर कोणी कितीही टीका केली तरीही मला काहीच फरक पडत नाही. मला माझ्या कामावर विश्वास आहे. 

महाराष्ट्रात या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे जागावाटपाच्या बाबतीत चर्चा सुरु असून बैठकी होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांना या संदर्भात विचारणा केल्यावर त्यांनी म्हटले, आमची जागावाटपावर पहिल्या फेरीत आधीच चर्चा झाली आहे. आता पुन्हा दुसऱ्या फेरीत चर्चा करणार आणि 288 जागांपैकी कोणती जागा कोणाला मिळणार हे ठरवू. नंतर निर्णय घेऊ. 
Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती