चेंबूर मध्ये आगीत एकाच कुटुंबातील 3 मुलांसह 7 जणांचा मृत्यू

रविवार, 6 ऑक्टोबर 2024 (12:05 IST)
मुंबईतील चेंबूर परिसरात रविवारी भीषण आग लागली. चेंबूर परिसरातील सिद्धार्थ कॉलनीतील एका मजली चाळीत आज पहाटे आग लागली, या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला.
 
चेंबूरमधील एका दुकानाला आज पहाटे 5 वाजता लागलेल्या आगीत 3 मुलांसह 7 जणांचा मृत्यू झाल्याचे बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व पीडित महिला दुकानाच्या वरच्या खोलीत राहत होत्या. आग लागली तेव्हा सर्व पीडित झोपले होते आणि त्यांना घरातून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही
 
बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आज पहाटे सकाळी 5 वाजता चेंबूरच्या एका दुकानात आग लागली. प्रथम इलेक्ट्रिक वायर मध्ये आग लागली नंतर आग वरच्या मजल्या पर्यंत पसरली. आग लागली तेव्हा पीडित कुटुंब गाढ झोपेत होते. त्यांना घरातून बाहेर निघायची संधीच मिळाली नाही. आणि ते आगीत होरपळून जळाले.

आगीची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दल आणि पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचली आणि पीडितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती