मिझोरम विधानसभा निवडणुकीसाठी 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. विरोधी पक्ष झोराम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) चे उमेदवार डॉ. लॉरेन लालपेक्लियन चिंजाह यांच्या नामनिर्देशन पत्रात काही तफावत आढळून आल्यानंतर त्यांची पुन्हा छाननी करण्यात येत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
2018 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या 38 कमी आहे. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF), प्रमुख विरोधी पक्ष ZPM आणि काँग्रेसने सर्व 40 जागांवर उमेदवार उभे केले आहेत आणि या सर्वांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.