जागतिक महिला दिन दरवर्षी येतो. त्या दिवशी मोठ्या पदांवर पोहचलेल्या महिलांचा सन्मान केला जातो तसेच स्ट्रगल करून आविष्यात पुढे वाढलेल्या महिलांचे कौतुक करून इतर महिलांसमोर त्यांचं आदर्श मांडण्यात येते आणि खरोखर हे गरजेचं आहे कारण आपल्या देशात आजदेखील महिलांना स्वातंत्र्य मिळण्याची गरज आहे. अशात एक प्रश्न त्या पुरुषांसाठी आहे की ते हा दिवस कशा प्रकारे आपल्या घरातील महिलांसाठी स्पेशल बनवू शकतात. मग ती महिला बायको, आई, सासू, बहीण, मुलगी, का नसो... कारण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात घरापासूनच केली तर अधिकच उत्तम ठरते...तर येथे आम्ही देत आहोत काही लहानश्या टिप्स ज्याने आपण आपल्या घरातील महिलांना या दिवशी स्पेशल असल्याची जाणीव करू शकता.
सकाळी उठल्यावर त्यांना गुलाबाच्या एका फुल देऊ शकता.
एका दिवसासाठीच का नसो पण त्यांना किचनपासून मुक्ती देऊन आपण सकाळी उठून त्यांच्यासाठी चहा, कॉफी, ब्रेकफास्ट, लंच तयार करू शकता.
त्यांनी जीवनात अधिक उंची गाठावी म्हणून प्रेरणादायी पुस्तके त्यांना भेट करू शकता.
त्यांचे आवडते छंद तर आपल्या निश्चित माहीत असतील अशात त्यांना पुन्हा त्यासाठी वेळ काढण्यासाठी प्रोत्साहित करावे. मग ते गार्डनिंग, पेंटिंग, म्युझिक, डांस किंवा इतर काही का नसो.
दिवसातून त्यांच्या एक तरी कामाची जबाबदारी स्वत: पेलाल असा संकल्प घ्यावा.
किमान बायकांवर जोक्स मारणार नाही हा संकल्प घेतला तरी पुरेसा होईल.