उन्हाळ्यात कैरी-पुदिन्याची चटणी बनवा, सोपी रेसिपी जाणून घ्या

गुरूवार, 1 एप्रिल 2021 (16:26 IST)
आज आम्ही आपल्याला कैरी-पुदिन्याची चटणी बनविण्याची रेसिपी सांगत आहोत. चवीला अत्यंत स्वादिष्ट व रेसिपी खूप सोपी आहे. जाणून घ्या कृती-
 
सामुग्री- कैरी - 4, टॉमेटो - 2, पुदिन्याच्या 4 गड्ड्या, कोथिंबीर - 1 गड्डी, हिरव्या मिरच्या - 10, आलं - 1 लहात तुकडा, जीरं- 1 लहान चमचा, मीठ - चवीप्रमाणे, पाणी -1/2 कप, साखर- अर्धा चमचा.
 
कृती - चटणी तयार करण्यासाठी सर्वात आधी कैरीचे सालं सोलून काप करुन घ्या. पुदिन्याचे पाने तोडून स्वच्छ धुऊन घ्या. कोथिंबीरीचे पाने तोडून स्वच्छ धुऊन घ्या. आलं सोलून घ्या. टॉमेटोचे चिरुन घ्या. नंतर मिक्सरच्या जारमध्ये सर्व सामुग्री घालून त्यात मीठ व साखर घाला. पाणी टाकून चटणी वाटून घ्या. आपण साखरेची चव आपल्या चवप्रमाणे कमी-जास्त प्रमाणात घालू शकता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती