श्राद्धात वड्याच्या नैवेद्याचं महत्त्व, जाणून घ्या भरड्याचे वडे कसे करावे

शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (12:10 IST)
श्राद्ध कर्मात भोजनात सामील खाद्य पदार्थांमध्ये वड्याचं खूप महत्त्व आहे. खीर-पुरी प्रमाणेच पानात वडे देखील असणे आवश्यक मानले गेले आहे. अनेक ठिकाणी तर या काळात केले जाणारे वडे वर्षभरात अजून कधीही न करण्याचा नियम असतो. अशात पितृ पंधरावड्यात याची चव काही वेगळीच असते. तर जाणून घ्या कसे तयार करायचे भरड्याचे वडे-

दोन वाटी जाड तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, आणि 1 वाटी हरभर्‍याची डाळ. या डाळी भाजून गिरणीतून भरडा काढावा.
 
आता या पिठात मीठ, तिखट, हळद, आवडीप्रमाणे वाटलेली मिरची पेस्ट आणि गरम तेलाचं मोहन घालून कोमट पाण्याने पीठ भिजवावं. आता हे मिश्रण प्लास्टिकवर थापून मध्यभागी भोक पाडून खरपूस तळून घ्यावं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती