दोन्ही डाळी 3 ते 4 तासापूर्वी भिजत घाला. काही डाळ तशीच ठेवून बाकीची डाळ वाटून घ्या. कढईत थोडंसं तेल टाकून बडी शेप आणि हिंग घाला. भगराळ डाळ आणि अक्खी डाळ दोन्ही परतून घ्या. सर्व मसाले थंड करून घ्या.
मैद्यात 1/2 चमचा मीठ मिसळून चाळून घ्या. दीड चमचा मोयन घाला आणि कणीक मळून घ्या लहान लहान गोळ्या बनवून हातावर गोळ्यांना पसरवून घ्या, कोपरे पातळ करून मध्ये मसाला भरून बंद करा. कचोऱ्या तयार करा.
तेल तापवायला ठेवा. गरम कचोऱ्या मंद आचेवर सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या. गरम कचोऱ्या दही किंवा हिरव्या चटणी सह सर्व्ह करा.