चिली पोटेटो विद हनी

बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (17:51 IST)
साहित्य - 
बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरलेला कांदा, बटाटे, हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, एक चमचा तीळ, शिमला मिर्च आणि हिरव्या कांद्याची पात, केचप, चिली सॉस, सोया सॉस, काळी मिरपूड, मीठ चवीप्रमाणे, मध, व्हिनेगर, कोर्नफ्लोर आणि तळण्यासाठी तेल.
 
कृती - 
सर्वप्रथम बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून त्याचे साल काढून बारीक बारीक उभे चिरून घ्या, त्यावर कोर्नफ्लोर भुरभुरून द्या आणि चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. आता कढईत तेल गरम करून त्यामध्ये या बटाटयांना तळून घ्या. बटाटे तपकीरी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. 

आता कढईत 2 चमचे तेल घालून बारीक चिरलेलं लसूण, कांदा, हिरव्या मिरच्या, तीळ घालून परतून घ्या. आता यामध्ये शिमला मिर्च, कांद्याची पात, केचप, चिली सॉस आणि सोयासॉस टाकून परतून घ्या. एका वाटीत पाण्यात घोळून ठेवलेलं कॉर्नफ्लोर घालून शिजवून घ्या. व्हिनेगर, काळी मिरी आणि मीठ घालून मिसळून शिजवून घ्या.
 
आता या मिश्रणात तळलेले बटाटे आणि मध घालून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. वरून कांद्याच्या पातीने सजवून घ्या. चविष्ट चिली पोटेटो विद हनी खाण्यासाठी तयार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती