कढीतील शेवग्याच्या शेंगा

गुरूवार, 6 मे 2021 (12:45 IST)
चार ते पाच शेवग्याच्या शेंगाची तुकडे करून मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेऊन चाळणीवर 10 ते 15 मिनिटे शेंगा वाफवून घ्या. त्यानंतर त्या थोडा वेळ थंड होऊ द्या.
 
साम्रगी-
अडीच वाटी दही, एक वाटी बेसन, आले-लसनाची पेस्ट एक चमचा, लाल मिरचीचे चार ते पाच तुकडे, फोडणीसाठी गोडेतेल, जिरं , मोहरी, कढीपत्ता, हिंग, मेथीदाणे अर्धा वाटी, बारीक चिरलेली कोथिंबिर एक वाटी, मीठ व साखर चवीनुसार.
 
कृती-
सर्वप्रथमएका भांड्यात दही घेऊन चांगले घुसळून घ्या. पाण्यात बेसन काठी न होऊ देता चांगले कालवून घ्या. कढाईत गोडेतेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, मेथीदाणे व हिंग घालून फोडणी द्या. मिरचीचस तुकडे घालून चांगले परता. आले- लसनाची पेस्ट टाका. वाफवलेल्या शेवग्याच्या शेंगा तव्यावर तेलात परतून घ्या.
 
कढीसाठी तयार केलेले मिश्रण घाला व परतलेल्या शेंगा एकत्र करून आवश्यक तेवढे पाणी घाला. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ व साखर टाका. कढी चांगली उकळू द्या. नंतर कोथिंबिर टाकायला विसरू नका. शेवग्याच्या शेंगा घातलेली कढी आपल्याला व आपल्याकडे आलेल्या पाहूण्यानाही नाविन्यपूर्ण वाटेल, यात शंकाच नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती