सर्वात आधी एका कढईत तूप गरम करावे. आता जिरे घालून हलके परतून घ्यावे. त्यात चिरलेला लसूण घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावा. नंतर त्यात चिरलेला पालकघालावा. पालक 2-3 मिनिटे परतवून घ्यावा. म्हणजे तो मऊ होईल. आता फेटलेले दही हळूहळू मिसळत असताना त्यात पालक घालावा. नंतर दही आणि पालकाच्या मिश्रणात पाणी घालून मंद आचेवर शिजवावे. चवीनुसार मीठ आणि मिरेपूड घालावी. नंतर 5-7 मिनिटे शिजू द्यावे. आता तयार सूप एका भांड्यात काढून कोथिंबिरीने गार्निश करावे. तर चला तयार आहे आपले दही पालक सूप रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.