Vastu Dosh Remedies तोडफोड न करता घरातील सर्व वास्तुदोष कसे दूर करायचे

शनिवार, 6 जानेवारी 2024 (15:22 IST)
Vastu Dosh Remedies जर तुमच्या घरात वास्तुदोष आहे आणि तो कुठल्याही प्रकारची तोडफोड न करता दूर केला जाऊ शकत नसेल तर आमचा एक सल्ला आहे की एकदा हे उपाय करून पहा आणि जर कही फरक पडत नसेल तर एखाद्या वास्तुशास्त्र तज्ञाशी संपर्क करून समस्याचे समाधान करा. चला जाणून घेऊया की कशा प्रकारे बिना तोडफोड वास्तुदोष दूर करू शकतो.
 
दक्षिणमुखी घर : जर तुमच घर दक्षिणमुखी आहे तर घराच्या समोर दारापासून दोन पावलांवर आग्नेय दिशामध्ये कडुलिंबाचे झाड लावू शकतात. त्याची तुम्हाला प्रत्येक दिवशी देखभाल करायची आहे.
 
टॉयलेटचा वास्तुदोष : जर कॉमन टॉयलेट बाथरूम आहे तर टॉयलेट तुटलेली किवा भेग पडलेली आहे किंवा शौचालय चुकीच्या दिशेत बनवले गेले आहे तर एक मोठया काचेच्या भांडयात खडं मीठ टॉयलेटमध्ये ठेवा. त्याबरोबर टॉयलेटच्या बाहेर दरवाजावर किंवा त्याच्या वरती शिकार करणाऱ्या सिंहाचे चित्र लावा.
 
स्वच्छता आणि सुगंध : घराची नियमित साफसफाई करून चारही बाजूने सुगंधीत वातावरण निर्मिति करण्यासाठी सुगंधाचा उपयोग करा. जिथे अस्वच्छता असते तिथे राहु हा ग्रह अशांत राहतो आणि जिथे दुर्गंधी असते तिथे शुक्र ग्रह अशांत राहतो खासकरुन टॉयलेट आणि बाथरूम स्वच्छ ठेऊन सुगंधीत करणे कधीही योग्य.
 
हवा आणि प्रकाश येईल असे रस्ते उत्तर आणि ईशान्य दिशेला ठेवा : जर तुमच्या दक्षिण दिशेला खिडकी आहे तर मोठे पडदे लावून ठेवा, जर दरवाजा असेल तर कडुलिंबाचे झाड लावून ठेवा. संभव असल्यास उत्तर दिशेला उजाळदान असावं. जर उत्तर आणि ईशान्य दिशेला खिडकी दरवाजे आहेत तर मग काहीच करण्याची गरज नाही. त्यालाच सुंदर बनवून ठेवा.
 
घराला सुंदर बनवा : घराला सुंदर चित्रे, पडदे या वस्तुनी सजवा. जसे की फ्लॉवरपॉट, पेटिंग, फूले, पारंपारिक चित्रे, झूमर, लटकन इत्यादी वस्तूंनी सजवून ठेवा. 
 
दरवाजा सुंदर आणि मजबूत बनवा : घराच्या मुख्य दाराची चौखट आणि उंबरठा याला मजबूत लाकडाने बनवा आणि त्याला सुंदर बनवा त्यावर नमस्कार असा चित्र लावा. तसेच त्यावर शुभ लाभ, ॐ याचे चित्रे लावा. उंबरठयाच्या दोघही बाजुला स्वस्तिक बनवा. आजूबाजूला सुंदर फुलांच्या कुंड्या ठेवा. आणि दरवाज्याची नियमित साफसफाई करा.
 
नळातून पाणी टपकणे : घरात जेव्हा नळातून पाणी टपकते तेव्हा ते अशुभ मानले जाते. तुमचे स्वयंपाक घर भींत किंवा अन्य ठिकाणी नळ टपकणे नकारात्मकतेला जन्म देते आणि आर्थिक नुकसान सोबत आरोग्य संबंधी समस्या निर्माण होतात. जर भिंतीत कुठे पाणी मूरत असेल तर ते लगेच ठीक करा. नळातून पाणी टपकने आर्थिक संकटांचे संकेत असतात. टपकणाऱ्या नळाला लवकरात लवकर दुरुस्त करावे. जर घरात कुठल्यापण भांड्यातून पाणी गळत असेल तर ते पण दुरुस्त करावे तसेच छतावर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी गळत असेल तर ते देखील दुरुस्त करावे.
 
खोल्यांचे रंग : प्रवेश कक्ष म्हणजे दरवाजातून आत आल्यावर जी खोली सगळ्यात आधी येते, तिथे पांढरा, हल्का हिरवा, गुलाबी किंवा निळा रंग देणे शुभ परिणाम देतं. बैठकीच्या खोलीत नेहमी पिवळा, धूसर, भूरा, हिरवा रंग शुभ असतो.
* जेवण्याच्या खोलीत तुम्ही हिरवा, निळा, हल्का गुलाबी किंवा इतर हल्का रंग लावू शकतात. हे तिघे रंग या खोली साठी शुभ असतात.
* मुख्य शयन कक्षात हिरवा, निळा, गुलाबी हल्का रंग लावायला पाहिजे. जो वास्तूच्या अनुसार त्या खोली साठी शुभ फल प्रदान करतात.
* लहान मुलांची खोली असेल किंवा जिथे लहान मुलांना झोपतात तिथल्या भींतिला निळा, हिरवा रंग शुभ असतो.
* स्वयंपाकघरामध्ये नेहमी शांतिदायक पांढरा रंग शुभ असतो. जो तिथल्या उर्जेला सकारात्मकता प्रदान करतो. * देवघरात सदैव गुलाबी, हिरवा, लाल रंग लावणे हे शुभ फल प्रदान करते. बाथरूमच्या आतील रंग गुलाबी, काळा, स्लेटी किंवा पांढरा असेल तर तो शुभ सकारात्मक फल प्रदान करतो.
* अध्यन कक्ष किंवा अभ्यास खोली तिथे हिरवा लाल, गुलाबी, हल्का निळा रंग शुभ असतो. 
 
इतर महत्वाचे उपाय : घरात देवघर असेल तर विशेषज्ञला विचारुन पूजा घर बनवा. आणि कुठल्या देवी देवताची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नये.
* तिजोरी मध्ये हलकुण्ड पिवळ्या वस्त्रात बांधून ठेवा. सोबत कवड्या, अत्तराची बाटली, चंदनची बट्टी, चांदी, तांब्याचे शिक्के, तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा. 
* प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाल कापुर जाला. घरात कुठे दोष असेल तर तिथे कापराची एक डबी ठेवा. कापुर जाळल्याने पितृदोष नष्ट होतो. 
* आठवड्यात एकदा गुरुवार सोडून मीठ पाण्यात टाकून त्याने पोछा लावल्यास घरात शांती राहते. घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते व भांडण होत नाही व लक्ष्मी प्रसन्न राहते. 
* घरात किंवा बाथरूम मध्ये कुठे पण कोळीचे जाले तयार होऊ देऊ नका. 
* घरात कधीच कचरा जमा होउ देऊ नका. 
* गच्चीवर कुठल्या ही प्रकारची अनुपयोगी वस्तु ठेवू नका.
* कधीच ब्रहमुहर्त आणि संध्याकाळी झाडू लावू नये. झाड़ू अशा ठिकाणी ठेवा की तिथे बाहेरून आलेल्या व्यक्तीची नजर पडणार नाही. 
* झाड़ू नेहमी पलंगखाली ठेवा. 
* घराला स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घराचे चारही कोपरे स्वच्छ ठेवा. खासकरुन ईशान्य उत्तर वायव्य कोपरे रिकामे आणि स्वच्छ ठेवा. 
* बाथरूमला सतत ओले ठेवणे आर्थिक स्थिति साठी चांगले नसते. काम झाल्यानंतर त्याला कपड्याने पुसून वाळवण्याचे प्रयत्न करावे.
* दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी ठेवणे हे करियरच्या स्थिरतेसाठी चांगले नसते. यासाठी या दिशेला रिकामे ठेवू नका. 
* घरात काला, वांगी कलरचा उपयोग वापर करू नका. मग चादर, पडदे, भिंतींचा रंग असो. 
* घरात फर्शी, भिंती, छताला भेगा पडलेल्या नसाव्या. असे असल्यास लगेच भरून काढा.
* बेड समोर आरसा कधीच लावू नये. झोपण्याच्या खोलीतत धार्मिक चित्रे लावू नये. बेडरूम मध्ये लाल रंगाचा बल्ब लावू नये. निळ्या रंगाचा बल्ब चालेल. खराब बिस्तर, तक्के, पडदे, चादर, चटई ठेवू नये. या खोलीत तुटका पलंग ठेवू नये. पलंगचा आकर सम्भवता चौकोनी पाहिजे. पलंग हा छताला बीम असतो त्या खाली ठेवू नका. * बेडरुमच्या दरवाज्या समोर पलंग ठेवू नका. लाकडी पलंग असेल तर अधिकच छान.
* बेडरूम मध्ये झाड़ू, चपला, इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स, तुटके आवाज करणारे पंखे, तुटलेल्या वस्तु, फाटलेले जूने कपडे, प्लास्टिक वस्तु ठेवू नये. 
* बाथरूम मध्ये निळ्या रंगाची बादली ठेवा आणि आंघोळीला लाकडी किंवा दगडी पाट ठेवा.
* बाथरूममध्ये कुठल्याही प्रकारचे चित्र लावू नये. तर उचित दिशा मध्ये एक आरसा जरूर लावावा. बाथरूम मध्ये * मनीप्लांट लावणे शुभ असते बाथरूम मध्ये वास्तु दोष दूर करण्यासाठी निळ्या रंगाचा मग आणि बादलीचा उपयोग करणे. 
* घराच्या जवळ केळी, तुळस, मनीप्लांट, डाळिंब, पिंपळ, वड, आंबा, नारळ, जांभूळ, पेरू यांसारखे झाडे लावले पाहिजे.
* नेहमी दार आणि उंबरठा यांची पूजा करावी व साफसफाई करावी. प्रत्येक खोलीसाठी वेगवेगळ्या रंगाचे कार्पेट आणावे व ते टाकून त्याची स्वछता ठेवावी. घराबाहेर दाराजवळ नेहमी रांगोळी काढावी.
* घराच्या बाहेर आणि आत वरती गणपतीचे चित्र लावायला पाहिजे. दरवाज्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला नमस्कार असलेले चित्र लावावे.
* दरवाज्याचा उंबरठा चांगला आणि मजबूत असावा ज्याच्या आजूबाजूला स्वस्तिक बनलेले हवे. दरवाज्याच्या बाहेर आपले गुरु किंवा अन्य देवी देवताचे चित्र लावू नये.
* स्वयंपाक घरात पितळ, कास्य, तांबा, चांदीच्या भांड्यांचा उपयोग करावा.
* आपल्या खिडकीला छान सजवून पडद्याने झाकून ठेवावे. खिडकीच्या आजूबाजूला छान चित्रे लावावी. 
* घरात अतिथि कक्षात हंसाचे मोठे चित्र लावावे. ज्याने खुप सारी समृद्धी आणि धन येईल. या शिवाय कुठे एखाद्या कोपऱ्या मध्ये धनाने भरलेले पात्र अस चित्र लावू शकतो. 
* गृहकलह आणि वैचारिक मतभेद यापासून वाचण्यासाठी हसणाऱ्या सयुंक्त परिवाराचे चित्र लावावे. जर तुम्हाला दुसऱ्यांचे चित्र लावायची नसतील तर स्वताच्या परिवरातील सदस्यांचे प्रसन्न चित्रे दक्षिण-पश्चिम दिशेच्या कोपऱ्यात लावावे. 
* समुद्राच्या किनारी सात घोडे असलेले चित्रे लावण्यासाठी पूर्व दिशा शुभ मानलेली आहे. हे चित्रे एखाद्या वास्तुशास्त्र तज्ञला विचारुनच लावावे.
* घोड्यांचे चित्रे लावायची नसतील तर पोहणाऱ्या मास्याचे चित्रे लावू शकतात. अतिथि कक्षात घरच्या मुख्य व्यक्ती बसत असेल त्यामागे पर्वत किंवा उडणाऱ्या पक्षीचे चित्र लावावे. असे चित्रे बघितले की आत्मविश्वास आणि मनोबल वाढते. 
* घराच्या दक्षिण भिंतीवर हनुमानजींचे लाल रंगाचे चित्रे लावावी. याचे दोन लाभ आहे. तुमचा मंगळ अशुभ असेल तर तो शुभ होतो. तुमच्या मनात कुठल्याच प्रकारचे भय राहत नाही.  
* स्वयंपाक घरात भिंतीला सुंदर फळांचे आणि भाज्यांचे चित्रे लावावी. अन्नपूर्णा देवीचे चित्रे लावल्यास बरकत राहते. 
* ज्या घरात स्वयंपाक घर दक्षिण-पूर्व म्हणजे आग्नेय कोपऱ्यात नसेल तर वास्तुदोषला दूर करण्यासाठी स्वयंपाक घराच्या उत्तर-पूर्व ईशान्य कोपऱ्यात सिंदूरी गणपतीचे चित्रे लावावी. जर तुमचे स्वयंपाक घर आग्नेय कोपऱ्यात नसून वेगळ्या दिशेला बनलेले असेल तर तिथे यज्ञ करत असलेल्या ऋषींचे चित्र लावावी. 
* जर मुलांचे मन अभ्यासात लागत नसेल तर अभ्यास खोलीत सरस्वती, वेदव्यास, पक्षी यांची चित्रे लावावी. तसेच मोर, वीणा, पेन, पुस्तक, हंस, मासा चित्रे लावू शकतात. कुल वास्तुकार जम्पिंग मासा, डॉल्फिन किंवा माश्यांची जोडी लावण्याचे सल्ले देतात. लक्षात ठेवा वरील कुठलेही एक प्रकारचे चित्र लावावे. 
* जर पती- पत्नी तणावात असतील तर तुम्ही बेडरूम मध्ये राधा कृष्ण, हंसचा जोडा असे चित्र लावू शकतात. या शिवाय हिमालय, शंख, बासरीचे चित्र लावू शकतात. लक्षात ठेवा कुठले तरी एक चित्रे लावावी. 
* जर बेडरूम आग्नेय कोपऱ्यात असेल तर पूर्व मध्य भिंतीवर शांत समुद्राचे चित्र लावावे. बेडरूम मध्ये चुकीनेपण पाण्याशी संबंधित चित्र लावू नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती