गजानन आनंदला। पाहूनियां त्या खेळाला।।
नाचताती चहू कोणीं। नूपुरें वाजती चरणीं।।
गोटी गोटीचा हो वाद। हरीचा हसण्याचा छंद।।
माझ्या स्वामींची करणी। कंप होतसे धरणीं।।
गोटी रामसिंग मारी। दुसरी गोटी होय करीं।।
गोटीचा हो पडला ढीग। चकित झाला विजयसिंग।।
एक प्रहर खेळ केला। समर्थें दाविली ती लीला।।
स्वामीसुत म्हणे झाला। अवतार, भक्ताच्या काजाला।।