Teacher's Day Quotes सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार

शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (10:33 IST)
देवाची पूजा होत नसून पूजा त्या लोकांची होते जे देवाच्या नावावर बोलतात.
 
पुस्तकं वाचल्याने आपल्याला एकांतात विचार करण्याची सवय आणि खरं आनंद सापडतं.
 
कोणतंही स्वातंत्र्य तोपर्यंत खरं नाही जोपर्यंत ते मिळवलेल्या लोकांना विचारांमार्फत ते व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नाही.
 
ते शिक्षक नाही जे विद्यार्थ्यांच्या मेंदूत तथ्य बळजबरीने थोपतात, शिक्षक तर ते असतात जे विद्यार्थ्यांना आव्हानासाठी तयार करतात.
 
शांतता ही राजकीय किंवा आर्थिक बदल केल्याने नव्हे तर मानवी स्वभावातील बदल केल्याने प्राप्त होते.
 
ज्ञानाच्या माध्यमातून शक्ती मिळते आणि प्रेमाच्या माध्यमातून परिपूर्णता.
 
पुस्तकाच्या माध्यमातून विविध संस्कृतींमध्ये पूल निर्माण करण्याचं काम घडतं.
 
शिक्षणाच्या परिणामरूप अशी व्यक्ती घडली पाहिजे जी ऐतिहासिक परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्ती यात लढा देऊ शकेल.
 
तांत्रिक ज्ञानासोबतच आत्म्याची महानता प्राप्त करणेही आवश्यक आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती