सुंदर माझे घर

ND ND
आपले घर मातीचे असो अथवा सिमेंट कॉक्रिटचे, ते आपल्या घामातून साकारले असल्याने आपल्याला प्रिय असते. पण हे घर नेहमी स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा प्रयत्नही केला पाहिजे. घर लहान असले तरी आपण त्याला स्वच्छ व सुंदर ठेऊन आलिशान बंगल्याचे रूप देऊ शकतो.

काही जण सणावारालाच घराची साफ-सफाई करताना दिसतात. ते साफ चुकीचे आहे. घराची व वस्तुंची रोज साफसफाई केली पाहिजे. नियमित साफसफाई केली तर घराच्या सौंदर्यात वाढ होते. घरातील इडापीडा जाऊन घरात लक्ष्मी नांदते. पती-पत्नी नोकरी करत असतील तर साप्ताहिक सुटीच्या दिवशी घराची साफ-सफाई केली पाहिजे. त्यासाठीच आम्ही आपल्याला काही टिप्स देऊ इच्छितो. त्याचा अवलंब जरूर करा.

* व्यॅक्यूम क्लीनरने सोफासेटचे कोपरे, कॉटवरील धूळ ‍साफ करावी.
* काचेचा टिपॉयवर पाणी टाकून वृत्तपत्राने ते स्वच्छ करावे.
* ट्यूब लाईट व पंखे मऊ कपड्याने स्वच्छ करावे.
* कम्प्युटर व माऊसवरील डाग काढण्यासाठी नेल पॉलिश रिमूव्हरचा उपयोग करावा.
* फरशी पाण्यात सुंगधित फिनेल टाकून पुसावी.
* घराची व्यवस्थित सफाई झाल्यानंतर रूम फ्रेशनरचा उपयोग करावा.

वेबदुनिया वर वाचा