कृती-
सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात किसलेली काकडी, उकडलेले बटाटे, कोथिंबीर, हिरवी मिरची तुकडे, आले किस, कांदा, बेसन, ब्रेडक्रंब, मीठ,मिरे पूड, जिरे पावडर आणि लिंबाचा रस घाला. सर्व साहित्य चांगले मिसळून घट्ट आणि गुळगुळीत मिश्रण तयार करा. आता या मिश्रणाचे छोटे छोटे भाग घ्या आणि हाताने गोल आकाराचे कटलेट बनवा. आता एका कढईत तेल गरम करा. कटलेट हलक्या तेलात घाला आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. कटलेट्स दोन्ही बाजूंनी चांगले शिजल्यावर ते किचन पेपरवर काढा जेणेकरून जास्तीचे तेल शोषले जाईल. तर चला तयार आहे आपले काकडीचे कटलेट रेसिपी, हिरव्या कोथिंबीर चटणी नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.