संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात..
माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर ? याची त्याला भीती वाटते..
मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात.. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत..
जाळायला काही नसलं तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते..
खर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो..!!
घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्याची ऐपत नेहमीच कमी असते..
प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते शेवटपर्य असतात.. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणस.. या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो..