नखांची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स जाणून घ्या

रविवार, 20 एप्रिल 2025 (00:30 IST)
Nail Care Tips :त्वचेची आणि केसांची काळजी घेताना नखांची देखील काळजी घेतली पाहिजे. तुंमची नखे कोरडी पडतात आणि लवकर तुटतात.तर नखांची अशा प्रकारे काळजी घ्या. या टिप्स अवलंबवा.
ALSO READ: त्वचेचा रंग उजळण्यासाठी हे प्रभावी घरगुती उपाय
बेस कोट लावा- 
नखांवर बेस कोट लावल्याने नख धूळ आणि घाणीपासून वाचतात आणि मजबूत होतात.  
 
नखांना मॉइश्चरायझ करा:
नखे खूप कोरडी होतात, अशा परिस्थितीत त्यांची आर्द्रता टिकवून ठेवणे खूप गरजेचे असते. यासाठी नखांना खोबरेल तेल किंवा बदामाच्या तेलाने मॉइश्चरायझ करू शकता. असं केल्याने ते मॉइश्चराइज होतात आणि कोरडे होऊन  तुटत नाही. 
ALSO READ: उन्हामुळे हात-पायांची चमक गेली असेल तर हे घरगुती उपाय करून पहा
नेल मास्क लावा- 
नखांची योग्य काळजी घेण्यासाठी नेल मास्क लावा.या साठी  बेकिंग सोडा किंवा अंडी आणि मध लिंबूमध्ये मिसळून नखांना लावू शकता. नखांसाठी हा एक चांगला नेल मास्क आहे. 
 
नखांना मोकळे ठेवा -
तुम्ही नेहमी नेलपेंट लावल्यास तुमच्या नखांना श्वास घेणे कठीण होईल. अशा स्थितीत वेळोवेळी नखांना नेल पेंट लावू नका आणि  श्वास घेऊ द्या. 
ALSO READ: चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी या भाज्यांचा रस लावा
पाण्यात जास्त भिजवू नका-
 तुमची नखे पाण्यात जास्त भिजवू नका. असे केल्यास नखांमध्ये कोरडेपणा येऊ शकतो. यामुळे नखे कमकुवत होऊ शकतात. आणि लगेच तुटतात.
 
Edited by - Priya Dixit 
 अस्वीकरण: आरोग्य, सौंदर्य काळजी, आयुर्वेद, योग, धर्म, ज्योतिष, वास्तु, इतिहास, पुराण इत्यादी विषयांवर वेबदुनियामध्ये प्रकाशित/प्रसारित होणारे व्हिडिओ, लेख आणि बातम्या केवळ सार्वजनिक हित लक्षात घेऊन तुमच्या माहितीसाठी आहेत. वेबदुनिया याची सत्यता पुष्टी करत नाही. कोणताही प्रयोग करण्यापूर्वी, कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती