रागात मर्यादा ओलांडू नका
नातं म्हटलं की थोडा तर ताण येणारच. याने नाते मजबूत होतात परंतू लिव्ह-इन रिलेशनमध्ये अशी स्थिती निर्माण झाल्यास रागात वायफळ बडबड करू नये. अनेकदा क्रोधात व्यक्ती वाटेल ते बोलत सुटतो परंतू जिभेवर ताबा ठेवणे गरजेचे आहे. कारण वेळ निघाल्यावर देखील त्या गोष्टी मनातील एखाद्या कोपर्यात दाटून राहतात. राग आल्यावर हे लक्षात ठेवा की एकमेकावर विश्वास असल्यामुळे हा निर्णय घेतला गेला.
मानसिक तयारी असावी
अशा रिलेशनमध्ये राहण्यासाठी मानसिक तयारी असली पाहिजे. अनेकदा आपल्याला पार्टनरच्या काही सवयी आवडणार नाहीत तरी त्यावर वाद न घालता समाधान काढणे योग्य ठरेल. काही गोष्टी दुर्लक्ष देखील कराव्या लागतील. तसेच समाजाला सामोरा जायची पण तयारी असली पाहिजे. कारण जग किती जरी आधुनिक झालं असलं तरी टोकणारे आणि अशा रिलेशनला नकारणार्यांची अजूनही कमी नाही.
कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहावे
आपण रिलेशनमध्ये असल्यावर पार्टनरचा कल्पना नसलेला खरा चेहरा दिसू लागला तर इमोशन्सवर ताबा ठेवून त्यातून बाहेर पडण्याची तयारी ठेवावी लागेल. ठराविक गोष्टी पलीकडे मुद्दे जात असल्यास किंवा विपरित परिस्थिती निर्माण होत असल्यास दुसर्या लाईफसाठी तयार राहावे.