आई वडील रागावले आहे ,त्यांचा राग दूर करण्यासाठी हे अवलंबवा

रविवार, 6 जून 2021 (13:12 IST)
आपल्या आयुष्यात रुसणे -फुगणे मनवणे हे चालत असतात.कधी कधी मुलांच्या वागणुकीमुळे आई-वडील रागावतात.त्यामुळे ते अबोला देखील घेतात. त्यांचा राग दूर करण्यासाठी या टिप्स अवलंबवा. जेणे करून त्यांचा राग शांत होऊन ते आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करतील.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 या कठीण काळात त्यांना साथ द्या-सध्या कोरोनामुळे प्रत्येक जण घाबरलेला आहे.अशा वेळी आपण त्यांना साथ दिली पाहिजे.त्यांच्या सह बसून बोला,त्यांचे सुख दुःख जाणून घ्या.आपण त्यांना विश्वास द्या की आपण नेहमी त्यांच्या बरोबर आहात.असं केल्याने त्यांचा राग नाहीसा होईल.
 
2 उंच आवाजात बोलू नका-लक्षात ठेवा की आपण आपल्या आई-वडिलांशी उंच आवाजात बोलू नये.बऱ्याच वेळा आपल्या या सवयीमुळे आई-वडील रागावतात.आपण त्यांची माफी मागून घ्या आणि त्यांना विश्वास द्या की या पुढे आपण असं करणार नाही.
 
3 बायकोने देखील सन्मान दिले पाहिजे-मुलाचे लग्न झाल्यावर प्रत्येक पालकांची इच्छा असते की मुलासह त्यांच्या सुनेने देखील त्यांची काळजी घेतली पाहिजे.परंतु काही लोक असे असतात जे लग्नानंतर आपल्या आई-वडिलांना विसरतात. असं होऊ देऊ नका,आपल्या पत्नीला देखील वडीलधाऱ्यांच्या आदर करायला त्यांची योग्य काळजी घेण्यास सांगा.
 
4 त्यांच्या गरजांना प्राधान्यता द्या- आपण लहान असताना आपले आई-वडील आपल्या सर्व इच्छा ,गरजा पूर्ण करत होते.आता आपले कर्तव्य आहे की आपण आपल्या आई-वडिलांच्या प्रत्येक गरजा प्रत्येक इच्छेला पूर्ण करावे. त्यांच्या औषध-पाण्याची काळजी घ्या.असं केल्याने त्यांना बरे वाटेल.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती