कोरोना लस घेतल्यानंतर सेक्स करताना काळजी घ्या

गुरूवार, 15 एप्रिल 2021 (11:44 IST)
भारतात कोरोना लसीकरण सुरु झाल्यानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न येत असताना एक प्रश्न शारीरिक संबधांबद्दल आहे की लस घेतल्यानंतर सेक्स करताना काय काळजी घ्यायला पाहिजे. यावर तज्ज्ञांचे मत वेगवेगळे आहे. सोशल मीडियावर यावर चर्चा सुरु आहे की कोरोना वॅक्सीन घेतल्यानंतर सेक्स करणे कितपत सुरक्षित आहे?
 
तथापि आरोग्य मंत्रालयाकडून यासंबंधी कुठेलेही दिशानिर्देश जाहीर करण्यात आलेले नाही परंतू मेडिकल एक्सपर्ट्स यांच्याप्रमाणे काही सावधगिरी बाळगणे योग्य ठरेल. तज्ज्ञांच्या मते पुरुष व महिलांनी वॅक्सीनच्या दुसर्‍या डोजनंतर गर्भनिरोधक घेतलं पाहिजे तसंच या दरम्यान फॅमिली प्लानिंग करु नये.
 
डॉक्टरांच्यामते अजून वॅक्सीनच्या लाँग टर्म साइड इफेक्ट्सबद्दल सांगणं जरा अवघडंच आहे म्हणून त्याचा सेक्स लाइफवर काय प्रभाव पडू शकतं हे अचूक सांगता येणार नाही परंतू लसीकरणानंतर संबंध न ठेवणे पर्याय नसू शकतो म्हणून बचाव हाच सुरक्षेचा योग्य पर्याय आहे.
 
तज्ज्ञांप्रमाणे लसीकरणाच्या दोन्ही डोजनंतर किमान 2 ते 3 आठवड्यापर्यंत कंडोम सारखं गर्भ निरोधक वापरणे योग्य ठरेल कारण सेक्स करताना शरीरातील फ्लूइड एकमेकांच्या संपर्कात येतं. वॅक्सीनचा काय प्रभाव पडेल हे सांगता येत नाही म्हणून कंडोम वापरणे सर्वात प्रभावी उपाय ठरेल.
 
एक्सपर्ट्सप्रमाणे वॅक्सीन घेतल्यावर किमान तीन महिने सेक्स दरम्यान कंडोम वापरणे योग्य ठरेल तसंच या दरम्यान स्पर्म डोनेट न करण्याचा सल्ला देखील देण्यात येत आहे. याशिवाय औषधांचे नवजात बालकांवर दुष्परिणाम झाल्याचे अनेकदा दिसून येत असताना किमान एक वर्ष तरी याबद्दल विचार करणे योग्य नाही. गर्भनिरोधक वापरावे हा सल्ला‍ दिला जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती