एका घनदाट जंगलात एक 'चतुर्दन्त' नावाचा हत्ती राहायचा. तो हत्ती हत्तींच्या कळपाचा नेता होता. एकदा जंगलात खूप मोठा कोरडा दुष्काळ पडला ज्यामुळे जंगलातील नदी, सरोवरे, तलाव सर्व पाण्याचे साठे अगदीच कोरडे पडले. झाडे, वृक्ष, गावत सर्व काही ओसाड झाले. मग सर्व हातींनी चतुर्दन्त ला सांगितले की, या दुष्काळामुळे आमचे मुले मरण पावत आहे. त्यामुळे लवकरात लवकर मोठ्या तलावाचा शोध घ्यावा.
मग बराच वेळ विचार केल्यावर चतुरदंत म्हणाले की, "मला एक तलाव आठवला. तो नेहमी पाताळगंगेच्या पाण्याने भरलेला असतो. चला आपण सर्वांनी तिकडे जाऊया." सर्व हत्ती तिथे पोहोचले. आता तलावात खूप पाणी होते. दिवसभर पाण्यात खेळल्यानंतर संध्याकाळी हत्तींचा समूह बाहेर पडला. तलावाभोवती सशांची घरे होती. हत्तींच्या पायाखाली सशांची घरे तुडवली गेली व अनेक ससे मरण देखील पावले. कुणाची मान मोडली, कुणाचा पाय मोडला. अनेक ससे हत्तींच्या पायाखाली चिरडली गेली. व अनेकांचा मृत्यूही झाला.
हत्ती परत गेल्यावर सर्व ससे एकत्र आले आणि त्यांनी एक बैठक घेतली. त्यांमध्ये आलेल्या संकटावर उपाय काढण्याचा विचार करण्यात आला. त्यांना वाटले - आजूबाजूला कोठेही पाणी नसल्याने हे हत्ती आता रोज या तलावावर येतील आणि आपले घरे पायांनी तुडवतील. अशा प्रकारे दोन-चार दिवसांत सर्व ससे नष्ट होतील.
या संकटातून मार्ग काढण्यासाठी एका सश्याने एकाने सुचवले की, आपण आता हे ठिकाण सोडून दुसऱ्या देशात जावे. पण, इतर ससे म्हणाले की, आम्ही आमच्या पूर्वजांची जमीन सोडणार नाही." आपण इथून का जावे इथे आपण खूप वर्षांपासून राहतो.
मग हत्तींच्या नेता चतुर्दन्त कडे सशांच्या वतीने एक लंबकर्ण नावाचा हुशार ससा दूत म्हणून पाठवण्यात आला. तसेच लंबकर्ण तलावाच्या वाटेवर एका उंच ढिगाऱ्यावर बसला; आता परत हत्तींचा कळप तिथे आला तेव्हा तो म्हणाला की, "हे तलाव चंद्राचे स्वतःचे तलाव आहे. तुम्ही इकडे येऊ नका." तेव्हा चतुर्दन्त म्हणाला की, "तू कोण आहेस?" त्यावर लंबकर्ण म्हणाल की, "मी चंद्रावर राहणारा ससा आहे. या तलावावर येऊ नका हे सांगण्यासाठी मला भगवान चंद्राने तुझ्याकडे पाठवले आहे." तेव्हा चतुर्दन्त म्हणाला की, ज्याचा संदेश तू घेऊन आलास ते भगवान चंद्र कुठे आहेत?" लंबकर्ण म्हणाला की, सध्या ते तलावात आहे. काल तुम्ही सशांची घरे उद्धवस्त केलीत. आज सशांची विनंती ऐकून ते इथे आले आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे पाठवले आहे. यावर चतुर्दन्त हत्ती म्हणाला की, असं असेल तर मला त्याला पाहू दे. मी त्याला नमस्कार करून परत जाईन." लंबकर्ण ससा एकटाच गजराजला तलावाच्या काठी घेऊन गेला. तलावावर चंद्राची सावली पडत होती. गजराजांनी त्याला चंद्र मानून नमस्कार केला व नकळत घडलेल्या पापाची माफी मागितली व परत त्या दिवसानंतर हत्तींचा समूह तलावाच्या काठावर आलाच नाही.
तात्पर्य : शक्ती पेक्षा केव्हाही युक्ती श्रेष्ठ असते.