पंचतंत्र कहाणी : निळा कोल्हा

शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024 (12:38 IST)
एका जंगलात एक कोल्हा राहत होता. तो खूप एकटा राहायचा. एकदा रात्री अन्नाच्या शोधात तो जंगलातून बाहेर पडला. तसेच त्याला एक निळीने भरलेली टाकी दिसली. त्याला वाटले की नक्कीच यामध्ये काहीतरी खाण्याची वस्तू असेल.तो त्या टाकीवर चढला. त्याने त्या टाकीमध्ये वाकून पहिले ज्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो त्या टाकीमध्ये पडला. त्याने टाकीमधून निघण्याचा प्रयत्न केला पण त्याला निघता आले नाही. ज्यामुळे त्याचे पूर्ण शरीर निळे झाले.
 
मग त्याने पुन्हा एकदा प्रयत्न करून उंच उडी घेतली अखेरीस तो टाकीच्या बाहेर आला. तसेच तो जंगलात आला. आता त्याने विचार केला की, या रंगाचा काहीतरी उपयोग करावा. तसे पाहिले तर कोल्हा मोठा धूर्त होता. तो जंगलात गेल्यावर इतर प्राण्यांना आणि कोल्ह्यांना भेटला व म्हणाला की, मला वनदेवी भेटली होती. मला हे रूप देऊन सांगितले की, तू या जंगलाचा राजा आहेस. सर्वांनी त्या धूर्त कोल्ह्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आता कोल्हा जंगलाचा राजा बनला होता. तसेच सर्वजण त्याला जेवण आणून द्यायचे त्याची सेवा करायचे. कोल्हा आरामात बसून राहायचा. पण एकदा घडले असे की, एक म्हाताऱ्या कोल्ह्याला त्याच्यावर संशय आला. व त्याने काही कोल्ह्यांच्या कानात सांगितले आणि म्हणाला की आपण सर्व कोल्हेकुई कोल्हेकुई करू या. तसेच सर्वजण कोल्हेकुई कोल्हेकुई करून ओरडायला लागले. निळ्या कोल्ह्याला राहवले गेले नाही. तो सुद्धा कोल्हेकुई कोल्हेकुई करू लागला. आता मात्र त्याचे पितळ उघडे पडले. व कोल्ह्यांनी त्याला जंगलच्या राजा सिंहाकडे दिले व त्याने त्याला ठार केले. 
 
तात्पर्य- सत्य कधीही लपवू नये ते कधीतरी समोर येतेच. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती