तेनालीराम कथा : अपराधी बकरी

बुधवार, 18 सप्टेंबर 2024 (12:41 IST)
रोजच्या प्रमाणे राजा कृष्णदेव राय आपल्या दरबारात बसलेले होते. तेव्हा तेथे एक मेंढपाळ आपली तक्रार घेऊन येतो. मेंढपाळाला पाहून राजा कृष्णदेव त्याला विचारातात की तू दरबारात का आलास?
 
तेव्हा मेंढपाळ म्हणाला की, ‘महाराज माझ्यासोबत चुकीचे घडले आहे. माझ्या घराजवळ राहणाऱ्या एका शेजारच्याच्या घराची भिंत ढासळली. व त्याखाली येऊन माझी बकरी गतप्राण झाली. मी त्याला नुकसान भरपाई मागितली तर त्याने नकार दिला.
 
मेंढपाळाची ही व्यथा ऐकून राजा काही बोलणार तेवढ्यात तेनालीराम आपल्या जागेवरून उठले आणि म्हणाले की, ‘अर्थातच भिंत पडल्यामुळे बकरी गतप्राण झाली महाराज, पण याकरिता एकट्या शेजारच्याला दोष देऊ शकत नाही. 
 
राजा सोबत दरबारात उपस्थित असलेले सर्व दरबारी तेनालीरामच्या या वक्तव्याने विचारात पडले. राजाने तेनालीरामला लगेच विचारले की, तुझ्या हिशोबाने भिंत पडली या करिता दोषी कोण आहे.
 
या वर तेनालीराम म्हणाला की, ‘ते मला माहित नाही, पण जर तुम्ही मला थोडा वेळ दिला तर मी या गोष्टीचे सत्य तुमच्यासमोर घेऊन येईल. राजाला तेनालीरामाचा पर्याय योग्य वाटला. त्यांनी तेनालीरामला शोध लावण्यासाठी वेळ दिला. 
 
राजाने परवानगी दिल्या नंतर तेनालीराम ने मेंढपाळच्या शेजारच्याला बोलावले. तसेच मृत पावलेल्या बकरीच्या बदल्यात काही नुकसान भरपाई देण्यास सांगितली.यावर मेंढपाळ जवळ लागणारा शेजारी म्हणाला की, ‘मी याकरिता जवाबदार नाही. ती भिंत बनवण्याचे काम कारागिरने केले होते. खरा अपराधी तर तो आहे. 
 
तेनालीरामला मेंढपाळचे हे म्हणणे खरे वाटले. याकरिता तेनालीरामने कारागीरला बोलावले. ज्याने त्या भिंतीला बनवले होते. कारागीर तिथे आला पण त्याने आपण निर्दोष असल्याचे सांगितले.
 
कारागीर म्हणाला की, ‘मी दोषी नाही. दोषी तर तो मजूर आहे ज्याने भिंत बांधण्यासाठी जे साहित्य वापरले ते पाणी टाकून बिघडवले होते. ज्यामुळे भिंत मजबूत बनली नाही व कोसळली.
 
कारागीरचे हे म्हणणे ऐकून मजुराला बोलावण्यासाठी सैनिक पाठवण्यात आले. तसेच मजूर उपस्थित झाल्यानंतर मजूर म्हणाला की, ‘याकरिता मी दोषी नाही तर दोषी तो आहे ज्याने साहित्यात पाणी जास्तीचे घातले. 
 
यानंतर जास्त पाणी टाकणाऱ्या व्यक्तीला राजदरबारात बोलावणे पाठवण्यात आले. पाणी टाकणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, ‘ज्या व्यक्तीने मला साहित्य तयार करण्यासाठी भांडे दिले होते ते भांडे मोठे होते ज्यामुळे पाणी जास्त झाले दोष त्या व्यक्तीचा आहे ज्याने मला मोठे भांडे दिले. 
 
आता तेनालीरामने पाणी टाकणाऱ्या व्यक्तीला विचारले की,ते मोठे भांडे कोणी दिले होते? तेव्हा तो व्यक्ती म्हणाला की, मला ते मोठे भांडे मेंढपाळणे दिले होते. ज्यामुळे पाणी जास्त झाले भिंत कोसळली. मग काय तेनालीराम मेंढपाळाला म्हणाला दोष तुझा आहे. तुझ्यामुळे तुझ्याच भाकरीचा जीव गेला.
 
जेव्हा गोष्ट फिरून मेंढपाळ वर आली तेव्हा तो गुपचूप आपल्याघराकडे निघून गेला. तेव्हा दरबारात उपस्थित सर्व तेनालीरामची बुद्धी आणि न्यायाचे गुणगान गाऊ लागले.
 
तात्पर्य-या कथेतून शिकायला मिळते की, आपल्यासोबत घडणाऱ्या घटनेसाठी दुसऱ्याला दोष देणे योग्य नाही. आपणच संकटकालीन परिस्थितीवर मार्ग शोधावा.  

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती